Crime News : गाढेगव्हाण येथे युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ  file photo
जालना

Crime News : गाढेगव्हाण येथे युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

नातेवाइकांचा मारहाणीचा आरोप, अकस्मित मृत्यूची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Crime News : Suspicious death of a youth in Gadhegavhan causes a stir

जाफराबाद / टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील गाढेगव्हाण येथे तीन दिवसापासुन बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असुन या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

गाढेगव्हाण येथील कैलास गुलाब गिरी (३०) या युवकाचा मृतदेह गावाशेजारील शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. मयत तीन दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह जालना येथे हलवण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी 2 ते 2:30 च्या सुमारास गुरे चारणाऱ्या एका गुराख्याला शेताकडे जाताना दुर्गंधीचा वास आला. वासाचा शोध घेतल्यावर विहिरीजवळील आडोशाला कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह पडल्याचे त्याच्या लक्षात आले. गुराख्याने तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली. यामुळे गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, बीट अंमलदार राजू डोईफोडे आणि रमेश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासणी करून मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले.

नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केल्याने अधिक स्पष्ट अहवालासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जालना येथे पाठवण्यात आला आहे. कैलास गिरी तीन दिवसांपासून बेपत्ता होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि विहिरीजवळ आढळल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड आणि बीट अंमलदार राजू डोईफोडे यांनी सांगितले की, सध्या अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जालना येथील शवविच्छेदन आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अद्याप कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अहवाल आलेला नाही. कैलासच्या मृत्यूमागील सत्य काय आहे याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे.

गाढेगव्हाण येथील कैलास गिरी या तीस वर्षीय इसमाचा मृतदेह विहीरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळुन आला आहे. मयताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आवाहल मिळताच गुन्हा दाखल करण्यात येईल.
अविनाश राठोड सहाय्यक पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT