Crime against accused for transporting beef
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी वाकडी-आन्वा रस्त्यावरील कल्याणी गावाजळ दुचाकीवरुन गोवंशाचे मांस घेउन जाणाऱ्या व गोवंश कापुन देणाऱ्या अशा दोन आरोपीस जेरबंद केले असुन त्याच्या ताब्यातुन ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत पारध पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी संतोष गुलाबराव जाधव यांनी दिलेल फिर्यादीत म्हंटले आहे कि, वाकडी आन्वा रस्त्यावरील कल्याणी गावाजळ दुचाकीवरुन गोवंशाचे मांस घेउन जाणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी पकडले. यावेळी त्याच्याजवळ १५ किलो गोमांस मिळुन आले. या बाबत पोलिसांनी विचारणा केली असता आरोपीने सदर मांस दुसऱ्या एका जणांने कापुन दिल्याची माहीती दिली.