Cotton Crop : कपाशीची वाढ जोमात, बोंडाचे प्रमाण कमी  File Photo
जालना

Cotton Crop : कपाशीची वाढ जोमात, बोंडाचे प्रमाण कमी

शहागड : शेतकऱ्यांवर अस्मनी संकट कायम, उत्पन्न घटणार

पुढारी वृत्तसेवा

Cotton growth is strong, but the number of bond is low

शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील शहागड परिसरात डोलमगाव, गोरी-गंधारी, पाथरवाला, गोंदी, वाळकेश्वर, कुरण, महाकाळा, साष्टपिंपळगाव, येथे यावर्षी पाऊस मे महिन्यातच पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर तो पाऊस काही ठिकाणच्या भागात फायद्याचा झाला तर काही ठिकाणी नुकसानीचा ठरला. सध्या कपाशीचे पीक जोमात आले असले तरी बोंडचे प्रमाण मात्र कमी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मे महिना संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असता बऱ्याच शेतकऱ्यांनी मे च्या शेवटी शेवटी कापूस लागवड केली होती. ते कापूस पीक जोरदार आले असून त्याची वाढ ही खूप झाली आहे. मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरीही मध्यंतरी पावसाचा तुटवडा झाल्याने त्याला दोड्या कमी लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

या पिकाबरोबर काही शेतकऱ्यांनी पैठण उजवा कालव्यावर व विहीर बोरच्या साह्यावर उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली तो सुद्धा ऊस उन्हाळयात बऱ्यापैकी दिसत होता तर या उशाला, पाऊस कमी झाल्याने त्यावर लालपाने व पांढरे ठिपके पडल्याने उसाची वाढ खुंटली आहे. त्यावर महागडे औषध फवारणीसाठी भरमसाठ पैसा शेतकऱ्याचा खर्च होत आहे पण दोन्हीही पिकाला यावर्षी अवरेज कमी निघणार असे यातून दिसत आहे.

सर्वत्रच पडलेल्या पावसाने सगळीकडे गारवा निर्माण केला होता तर खरिपाच्या पेरणीसाठी हा पाऊस एकदम सोईस्कर झाला होता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करून त्यानंतर गव्हाची बेवड करण्यासाठी पहिला ऊस मोडीत काढून त्या जागेवर कापूस लागवड केली तो कापूस सध्या जोमात असल्याने त्याची वाढ एकदम पाच-सहा फुटापर्यंत झाली असून मात्र त्या वाढलेल्या कपाशीला दोड्या, फुले, पाने कळया एकदम कमी प्रमाणात दिसत आहेत.

आणि जास्त पाणी ऑगस्ट महिन्यात झाल्यानंतर ऊस लाल झाला असून, कपाशी हि लाला झाल्याने पिकावर पावसाच परिणाम झाल्याने कीड व रोगांपासून शेतकरी फवारणी करीत असला तरी सूर्योदय होत नसल्याने. शेतकऱ्याचे हाताशी आ-लेले पीक वाया जात असून, महागडी फवारणी करूनही, कपाशी उसावर रोग (आळीचा) प्रादुर्भाव झालेला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

कपाशी शेती बहरली परंतु, कपाशीला अद्यापही दोड्या लागलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी जे बियाणे घेतले आहे ते बोगस तर नाही अशी शंका व्यक्त केलेली आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रातील मालक चिंतेत आहे.
- गणेश खराद, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT