जाफराबाद ः तालुका बांधकाम कामगारांच्यावतीने बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  (छाया ः मुकेश भारव्दाज )
जालना

Construction workers protest : बांधकाम कामगारांचा जाफराबाद तहसीलवर मोर्चा

कामगारांची लूट होत असल्याचा आरोप, चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : जाफराबाद तालुका बांधकाम कामगारांच्या विविध शासकीय योजनांबाबत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत धडक कामगार संघटनेने तहलिस कार्यालयावर मोर्चा काढुन प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी राजूर गणपती येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये कामगारांकडून चिरीमीरीची मागणी होत असल्याचे समोर आल्याने संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जाफराबाद तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ स्थानिक पातळीवरच देण्यात यावा, यासाठी यापूर्वी तहसील कार्यालयात निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते.

मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला.दरम्यान, राजूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये योजनांच्या नावाखाली कामगारांकडून चिरीमीरीची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. गरिब बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ देण्याऐवजी त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही,असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. योजनांची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करावी, तसेच जाफराबाद येथेच शिबिरे आयोजित करून कामगारांना थेट लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.यावेळी धडक कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालणे आवश्यक आहे. कामगार, सर्वसामान्य नागरिक किंवा स्थानिकांच्या हिताशी संबंधित कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये. प्रशासनाने जबाबदारीची जाणीव ठेवून त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. कामगार संघटना सदैव न्यायासाठी लढत राहील आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाईल.
निसार शहा, तालुका उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन महासंघ जाफराबाद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT