काँग्रेसचे 'रघुपती राघव राजाराम' आंदोलन file photo
जालना

काँग्रेसचे 'रघुपती राघव राजाराम' आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी भोकरदन येथे "रघुपती राघव राजाराम" आंदोलन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

Congress's 'Raghupati Raghava Raja Ram' protest

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी भोकरदन येथे "रघुपती राघव राजाराम" आंदोलन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे व माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात शहरातील पोस्ट ऑफीस जवळील दक्षिणामुखी मारुती मंदिर येथे भजन-कीर्तनाने झाली. त्यानंतर श्रीरामाची आरती करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी दूर कराव्यात, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची चौकशी करावी, नीट-युजी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात तसेच जालना जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलना दरम्यान सरकारच्या करत कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य धोरणांबाबत घोषणाबाजी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष राहुल देशमुख, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस, रऊफ परसुवाले, रहीम तांबोळी, सुरेश गवळी, राजाभाऊ कुलकर्णी, अशोक उबाळे, शांतीलाल बनसोडे, अनिल देशपांडे, भाऊसाहेब सोळंके, त्रिंबक आप्पा पाबळे, अब्दुल सत्तार यांच्यासह भोकरदन तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संघर्ष सुरू राहणार

शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT