Chilli crop destroyed due to lack of water
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील हिसोडा सह परिसरात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे मिरचीचे पिक धोक्यात आले आहे. पावसाळा लांबल्यायने विहीरी व बोअरचे पाण्याने तळ गाठल्याळने मिरची पिकास देण्यासाठी पाणी नसल्या ने मिरचीचे पिक माना टाकतांना दिसत आहे.
हिसोडा येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर जगताप यांनी 20 एप्रिल रोजी दोन एकर शेतात मिरचीची लागवड केली होती. सुरुवातीला पीक जोमात होते. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विहिरी व बोअरचे पाणी आटल्याने मिरचीच्या झाडांना पाणी मिळेनासे झाले. टँकरने पाणी देणेही परवडत नसल्याने अखेर जगताप यांनी संपूर्ण पीक उपटून टाकले. जगताप यांचे बियाणे, खते, औषधे, मजुरी व मशागतीवर जवळपास एक लाख रुपये खर्च झाले होते.
"पाणी असते तर याच शेतातून त्यांना अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळाले पाऊस लांबल्यााने असते. दुष्काळसदृश परिस्थिती आहे.
हिसोडा येथे शेतात 20 एप्रिल रोजी मिरची लागवड केली होती. यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च केला. परंतु विहिरींला पाणी कमी झाल्यालने टँकरद्वारे देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिरचीला देणे परवडत नसल्योने अखेर शेतातील दोन एकर मिरची काढुन टाकली आहे.- रामेश्वर जगताप, शेतकरी, हिसोडा