बालकामगार कृती दलाची कारवाई; १२ वर्षीय बालकाची सुटका File Photo
जालना

बालकामगार कृती दलाची कारवाई; १२ वर्षीय बालकाची सुटका

मराठा नाश्ता सेंटरच्या मालकावर कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Child Labor Action Force takes action; 12-year-old boy rescued

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील मोती बाग परिसरातील मराठा नाश्ता सेंटर येथे बालकामगार राबत असल्याचे उघड झाले असून, बालकामगार कृती दलाने सोमवार (दि. १६) रोजी धाड टाकून एका १२ वर्षीय बालकाची सुटका केली. या प्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या आदेशानुसार, जालना जिल्ह्यात बालकामगार विरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास दुकाने निरीक्षक अमित भिंगारे, सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव, दुकाने निरीक्षक विवेक पाटील, चाईल्ड लाईनचे एस. व्ही. दाभाडे, आयएसडब्लू संस्थेचे नितीन जहऱ्हाड, आणि सीएचसी केज वर्कर सुलतान शहा यांच्या पथकाने जुना जालना भागातील संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या मराठा नाश्ता सेंटर येथे तपासणी केली.

चपात्या लाटताना आढळला बालक

या धाडसत्रादरम्यान, अवघ्या १२ वर्षे ११ महिने वयाचा एक बालक तिथे चपात्या लाटण्याचे काम करताना पथकाला आढळून आला. विचारपूस केली असता, तो गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी कूक (स्वयंपाकी) म्हणून काम करत असल्याचे समोर आले. पथकाने तातडीने या बालकाची मालकाच्या ताब्यातून सुटका केली आणि त्याला महिला व बाल विकास विभागाच्या हवाली केले.

बालकामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही तीव्र केल्या जातील. मुलांचे बालपण हिरावणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई केली जाईल.
अमोल जाधव, सरकारी कामगार अधिकारी, जालना.
जे बालकामगार अढळतात त्याच्या मालकावर योग्यती कायदेशीर कारवाई करून बालकाचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक तपासणी अहवाल करून बालकाचे सामाजिक आर्थिक स्तर अवलोकन केल्या जाते. बालकाला बालसंगोपन योजना यासह इतर योजनेच्या लाभासाठी शिफारस करण्यात येते.
एकनाथ राऊत, अध्यक्ष बाल कल्याण समिती जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT