Celebrate Ganpati festival by following the rules: Additional Superintendent of Police Nopani
अंबड, पुढारी वृत्तसेवा नियमांचे पालन करून गणेश-ोत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया शनिवार दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात भेट देऊन तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगामी वर्षाचा गणेश उत्सव १० दिवसावर येऊन ठेपलेला असताना या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुरक्षा सुरक्षा संहितेच्या कलमाखाली ३८० लोकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी यावेळी दिली.
दरम्यान यात खून, मारामारी आणि मागच्या वर्षी गणेश उत्सवाच्या काळात दाखल झालेले गुन्हे अशा ३८० लोकावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून उत्सव समितीच्या पदाधिकारी तसेच नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करून शांतपणे गणपती उत्सव साजरे करावे असे आवाहन आयुष नोपानी यांनी यावेळी केले.
दरम्यान गणेश उत्सवात डीजे साउंडवर सुद्धा पोलिसांची करडी नजर असणार असून डीजे मुक्त जिल्ह्यातील गणपती झाले पाहिजे असाही प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची सुद्धा माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके, घनसावंगी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राठोड, गोंदी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आशीष खांडेकर, तीर्थपुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.