Vadigodri Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी जाताना वडीगोद्रीजवळ कारचा अपघात; ८ भाविक जखमी File Photo
जालना

Vadigodri Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी जाताना वडीगोद्रीजवळ कारचा अपघात; ८ भाविक जखमी

धुळे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे दुभाजकाला कार धडकली.

पुढारी वृत्तसेवा

Car accident near Vadigodri while going to Pandharpur; 8 devotees injured

वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे दुभाजकाला धडकून अपघात झाला. यात कारमधील आठजण गंभीर जखमी झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोणगाव तांबे येथील तांबे कुटुंबीय पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जायकवाडी डावा कालव्याच्या कठड्याला धडकून कारचा अपघात झाला.

या कारच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या कारला ओव्हरटेक केले. त्यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटून कार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री जवळील डावा कालव्याच्या कठड्याला धडकली. या अपघातात कारमधील आठजण जखमी झाले.

या अपघातातील जखमींची नावे

विष्णू हरीचंद्र तांबे (वय ५०) रा.डोणगाण तांबे ह.मु शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर

सरला विष्णू तांबे (४५)

हौसाबाई हरीचंद्र तांबे (७५)

मिरा रमेश लहाने (४५)

कौसाबाई भिमराव जाधव (६५) रा.कडेठाण,

वैभव विष्णू तांबे

चांदणी विष्णू तांबे

वैशाली विष्णू तांबे

भागुबाई कल्याण तांबे या सर्व जखमींवर पाचोड व छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT