Businessman kidnapped at gunpoint; Two accused arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील भोकरदन रोडवरील आस्था हॉस्पीटलच्या बाजुला असलेल्या किराणा दुकानाचे व्यापारी चंदन बसंतीलाल गोलेच्छा या व्यापाऱ्याचे पिस्तुलचा धाक दाखवुन ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी २९जुन रोजी अपहरण करण्यात येउन व्यापाऱ्याकडुन आरोपींनी चार लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कारवाई करीत दोन आरोपींना जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातुन २ लाख १० हज-ाराचा मुद्देमाल व पिस्तुल जेरबंद केले.
जालना शहरातील भोकरदन रोडवर असलेल्या आस्था हॉस्पीटल जवळ असलेल्या किराणा दुकानाचे मालक चंदन बसंतीलला गोलेच्छा यांचे २९ जुन रोजी पिस्तुलचा धाक दाखवुन अपहरण करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी गोलेच्छा यांना जिव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडुन चार लाख रुपये नेले होते.
३० जुन रोजी या बाबतची तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल होताच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींना मोबाईल बंद केल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान ५ जुलै रोजी गुन्हयातील आरोपी अक्षय रविंद्र गाडेकर व विठ्ठल भिमराव अंभोरे असे दोघेजण एका काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवर येउन शहरातील विशाल कॉर्नर येथील बायपास रोडवर थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीकडे जात असल्याच्या संशयावरुन दोन्ही आरोपींनी दुचाकी जागेवर सोडुन शेतात पळ काढला. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी दोन्ही आरोपींचा एक ते दीड किलोमीटर पाठलाग करुन त्यांना शिताफीने पकडले.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्क पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कैलास खार्डे, दिपक घुगे, सागर बाविस्कर, किशोर पुंगळे, सचीन राऊत, धिरज भोसले, अशोक जाधवर (चालक) यांनी केली आहे.