Bribe Case Pudhari
जालना

Bribe Case : कृषी विभागातील मासा 'एसीबी'च्या गळाला

ठिबक सिंचनाच्या कामासाठी १७५०० रुपयांची लाच

पुढारी वृत्तसेवा

Bribe of ₹17,500 for drip irrigation work

जालना, पुढारी वृत्तसेवा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ठिबक सिंचन संचाच्या मोका तपासणीचा अहवाल ऑनलाइन पाठविण्यासाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी (सुपरवायझर) विश्वनाथ लक्ष्मण गावीत (वय ४३) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. अंबड तालुक्यातील पाणेगाव शिवारात शुक्रवारी (दि. ७) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार ३३ वर्षीय असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तक्रारदारांच्या आई, भाऊ, भावाची पत्नी आणि स्वतःच्या नावावर असलेल्या एकूण ४ हेक्टर ८ आर शेतजमिनीमध्ये ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून पूर्वसंमती मिळाली होती.

शेतात ठिबक सिंचन संच बसवून त्याची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली होती जुलै २०२६ मध्ये आरोपी विश्वनाथ गावीत यांनी तक्रारदारांच्या शेतात जाऊन मोका तपासणी केली. मात्र, तपासणीचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे ऑनलाइन पाठविण्यात आला नव्हता. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी ६ ऑगस्ट रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. शुक्रवारी (दि. ७) सकाळी १०.३४ ते ११ वाजेदरम्यान अंबड तालुक्यातील पाणेगाव येथील शेतात १७हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर गावीत यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गजानन घायवाट, मनोहर भुतेकर, संदीप लहाने आणि चालक भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT