गोसावी पांगरी येथील मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. 
जालना

जालना : गोसावी पांगरी येथील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

दिनेश चोरगे

परतूर : महादेवाचे दर्शन घेऊन परत घरी येत असताना रस्त्यालगत असणाऱ्या तलावात मित्रांसोबत पोहायला उतरलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथे सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. विकास अर्जुन पवार (वय १६ रा. पांगरी गोसावी) असे या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विकास हा सोमवारी आपल्या मित्रांसोबत गावातील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता. देवाचे दर्शन घेऊन घराकडे येत असताना पांगरी शिवारातील लघु तलाव (सांडवा) मध्ये मित्रांसोबत पाण्यात पोहण्यासाठी उतरला. विकास याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागला. त्याला बुडताना पाहून मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दिसेनासा झाला. त्यांनतर घाबरलेल्या मित्रांनी याची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सपोनि राहूल जाधव, सहा.पोलीस उप निरीक्षक नंदु खंदारे, किरण चव्हाण, देवा जाधव, सतिश जाधव यांनी घटनास्थळी धाव मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. गोसावी पांगरी येथील पोलीस पाटील यांच्या तक्रारीवर परतूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहा.पोलिस उपनिरिक्षक नंदू खंदारे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT