Biker killed in collision with unknown bus
अंबड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मठ पिंपळगाव पाटीवर दुचाकीला अज्ञात बसने शुक्रवारी (दि.१2) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धडक दिली. अपघातानंतर बसचा चालक बस भरधाव वेगाने न थांबता अंबडच्या दिशेने निघून गेला. केदारनाथ सुभाषचंद्र भदादे (अंदाजे ४२ वर्ष, रा. आनंद स्वामी गल्ली जालना) असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, केदारनाथ सुभाषचंद्र भदादे हे शुक्रवारी सायंकाळी जालना अबड रोडने दुचाकीवरुन (क्रमांक एमएच-२१, सी- ४७६३) जालन्याच्या दिशेने जात होते. सव्वा पाच वाजेच्या सुमारास मठ पिंपळगाव पाटीजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या जालन्याहून अबडकडे जानाऱ्या अज्ञात बसने भदादे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. व बस अंबडच्या दिशेने न थांबता भरधाव वेगाने निघून गेली. या अपघातात दुचाकीस्वार केदारनाथ सुभाषचंद्र भदादे अंदाजे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान यावेळी अंबड पोलिस ठाण्याचे ए.एस.आय. राम मते, पोलिस कर्मचारी संतोष घाणे व विष्णू जाधव हे जालना येथील कारागृहात आरोपी सोडून अंबडकडे येत असताना त्यांनी अपघात झाल्याचे पाहिले. त्यांनी घटनास्थळी थांबून घडलेल्या अपघाताची माहिती अंबड पोलिस ठाण्याला देऊन अॅम्बुलन्सला पाचारण केले. अॅम्बुलन्स आल्यानंतर भदादे यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अंबड पोलिस पुढील तपास करीत आहे.