Big decline in red pepper production
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : स्वयंपाक घरातील चवीला तिखटपणा देणारी लाल मिरची आता सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
दुसरीकडे कडक उन्हामुळे आवक घटल्याने बाजारात लाल मिरचीचे दर अक्षरशः आग ओकत आहेत. मसाला हंगामाच्या तोंडावरच मिरची महागल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असल्याची ओरड होताना दिसत आहे.
यंदा मिरचीच्या लागवडीपासूनच निसर्गाची साथ मिळाली नाही. फुलोऱ्यात असतानाच पावसाने फटका दिला, तर पीक हाती येताना कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला. उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाल्याचा अंदाज आहे.
मात्र, मार्च एप्रिल महिना हा वर्षभराचा मसाला साठवण्याचा काळ असल्याने बाज- ारात मागणी प्रचंड वाढली असून, पुरवठा कमी असल्याने दराने उच्चांक गाठला आहे.
यंदा मिरचीची आवक निम्यावर आली आहे. परराज्यातील बाजारपेठांतूनच मिरची महाग येत असल्याने आम्हालाही वाढीव दराने विक्री करावी लागत आहे.
मिरचीचा दर (प्रतिकिलो)
गावठी - २५० रुपये
चपाटा - ३०० रुपये
रसगुल्ला ३६० रूपये