Bhokardan : पावसाअभावी तूर संकटात; लाखोंचे नुकसान file photo
जालना

Bhokardan : पावसाअभावी तूर संकटात; लाखोंचे नुकसान

यंदा भोकरदन तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bhokardan: Tur in crisis due to lack of rain; losses run into lakhs

बाभूळगाव, पुढारी वृत्तसेवा : यंदा भोकरदन तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बाभूळगांव, सिपोरा, कोदोली, लिंगेवाडी, चोऱ्हाळा, विरेगांव, मासनपुर परिसरासह तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात अंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली होती. कसे-बसे सोयाबीन पीक हातात आले असले तरी आता अंतरपीक असलेली तूर मात्र ऐन फुलोऱ्यात पाणी नसल्याने संकटात सापडली आहे.

परिसरात जुलै-ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. सोयाबीनचे सरासरी उत्पादन ३ ते ४ क्विंटलवरच थांबले. त्यामुळे झालेला खर्चही निघाला नाही. आता सर्व आशा अंतरपिकातील तुरीवर होती, मात्र जमिनीत ओलावा नसल्याने फुलगळ मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.

सध्या तूर पीक १६० दिवसांच्या अवस्थेत असून फुलोरा ते शेंगा भरण्याचा महत्त्वाचा काळ सुरू आहे. याच काळात पाण्याची नितांत गरज असताना पाणीच नसल्याने पीक माना टाकू लागले आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तूर फुलोऱ्यात आहे. यावेळी पाण्याची गरज असताना पाणी उपलब्ध नसल्यामुळे पिक अडचणीत आले आहे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

भरघोस मदतीची अपेक्षा

सोयाबीन पिकामध्ये अंतरपीक तुर हे पिक घेतले. पावसाअभावी सोयाबीनच्या पिकाचा उतारा कमी आला. त्यात खर्च सुद्धा निघाला नाही. आता तुर येईल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. या वर्षी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यावर हे दुष्काळाले आसमानी संकट आले आहे. शासनाने तुटपुंजी मदत न करता भरघोस मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT