भोकरदन ः भोकरदन पोलिसांनी सलग दोन दिवस शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरांचा तपास लावुन दोन्हीही दुचाकीसह चोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
भोकरदन शहरातील गाढे हॉस्पीटल समोरुन 6 जून रोजी मध्यरात्री 01.00 वाजेच्या सुमारास बजाज पल्सर (क्र.एम एच 21 बी एन 6759) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. या बाबत कपील बाळासाहेब गाढे याच्या फिर्यादीवरुन भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
05 जून रोजी मध्यरात्री 02.30 वाजेच्या सुमारास शहरातील पुखराज नगर येथुन अज्ञात चोरटयाने बजाज डिस्कव्हर कंपनीची (क्र.एम एच 21 झेड 3028) ही दुचाकी चोरुन नेली होती. या प्रकरणी रमेश कडुबा कांबळे यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात 08 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील दोन्ही गुन्हयाचे तपासात बजाज पल्सर मोटर सायकल सह आरोपी विशाल जगन्नाथ फुके ( रा. दानापूर ता. भोकरदन ) व दुसऱ्या प्रकरणात बजाज डिस्कव्हर ही आरोपी नामे सय्यद अबरार सय्यद विकार (रा.नुराणी मस्जिद जवळ भोकरदन ) यांचा तात्काळ शोध घेवुन त्यांना 12 तासाच्या आत दुचाकीसह आरोपीस ताब्यात घेतले .