आन्वा ः भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे आयोजित विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी मार्गदर्शन करतांना आ.संतोष दानवे pudhari photo
जालना

MLA Santosh Danve : विकासापासुन एकही गाव वंचीत राहणार नाही

आ. दानवे ः आन्वा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

आन्वा : भोकरदन - जाफ्राबाद मतदारसंघातील एकही गाव विकास कामापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात विविध विकास कामांचे लोकार्पण व नवीन कामांचे भूमिपूजन पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रमुख पाहूणे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश ठाले, शासकीय गुत्तेदार सुधाकर दानवे, प्रतिक दानवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, सांडू वाघ, कैलास पाजगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार दानवे म्हणाले की, भोकरदन तालुक्यातील एकही गाव रस्ते, सिमेंट काँक्रीट नाले, सभामंडप, पाणीपुरवठा योजना तसेच इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, अनेक गावात मागच्या दहा वर्षांत विविध विकास कामांसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळाली आहे असे ते म्हणाले.

विकास कामांबद्दल समाधान

या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत आमदार संतोष दानवे यांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे परिसरातील विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT