भोकरदन: भोकरदन तालुक्यातील नांजावाडी शिवारातील अवैद्य गर्भ लिंगनिदान व गर्भपात प्रकरणात जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन आरोपींना अटक केली- यातील दोन आरोपींना भोकरदन न्यायालयासमोर उपस्थित केले असता तीन नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आता या प्रकरणात एकूण पाच आरोपी झाले आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली आहे. दरम्यान नव्याने अटक करण्यात आलेले आरोपी अनंता भिकाजी चौबे यांच्या भोकरदन शहरातील चौबे मेडिकल एजन्सी याची झाडावरती शुक्रवारी पोलिसांनी घेतली असून यानंतर शहरातील सर्वच मेडिकल घाऊक एजन्सी व रिटेल मेडिकल दुकानदार यांची तपासणी करण्यात येणार आहे.
वरील प्रकरणात सर्वप्रथम घटनास्थळावर अटक करण्यात आलेले आरोपी केशव गावंडे व सतीश सोनवणे यांनी पोलीस कोठडी दरम्यान सांगितलेल्या माहितीच्या आधारे या दोघांना गर्भपात संबंधाने लागणारे औषधी गोळ्या (टॅबलेट) भोकरदन येथील चौबे मेडिकल एजन्सी चे अनंता भिकाजी चौबे वय 53 वर्षे राहणार जे.पी .नगर भोकरदन, तसेच धाड जिल्हा बुलढाणा येथील घाऊक मेडिकल एजन्सी चालक योगेश सुकलाल चांदा वय 30 वर्ष राहणार चांडोळ तालुका जिल्हा बुलढाणा हे पुरवीत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांना भोकरदन न्यायालयासमोर शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी उभे केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान ज्या ठिकाणी हे कृत्य करण्यात येत होते त्या जागेचा मालक समाधान सोरमारे हा फरार होता मात्र त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.