Jalna Crime News : युवकाच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त

युवकाच्या ताब्यातून तीन जीवंत काडतुसासह गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहे.
Gawati knife seized
युवकाच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त File Photo
Published on
Updated on

Gawati Pistol seized from youth's possession

जालना, पुढारी वृत्तसेवा युवकाच्या ताब्यातून तीन जीवंत काडतुसासह गावठी पिस्टतल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जालना तालुका पोलिसांनी रविवार दि. २३ रोजी मध्यरात्री पावने एक वाजेच्या सुमारास जालना अंबड रोडवरील अंतरवाला येथे केली.

Gawati knife seized
Manoj Jarange Patil | 'गुंडगिरीच्या जोरावर राजकारण'; मुंडेंच्या वाल्मिकबद्दलच्या विधानावर जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया

या संदर्भात अंतरवाला गावाजवळ चारचाकी (क्र. एमएच ०२, सीव्ही ६७७४) मधील काही युवकात आपसांत भांडण सुरू होते. यातील एका व्यक्ती जवळ गावठी कट्टा असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन तालुका जालना पोलिस ठाण्याच्या पथकाने

त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आपसांत भांडण करणाऱ्यांना शांत केले. झाडाझडीत पवन प्रसाद पालवे (२०, रा. सेलू, जि. परभणी) याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला. त्यासोबत तीन जीवंत काडतुसेही आढळून आले आहेत.

Gawati knife seized
Jalna News : जिल्हा महिला काँग्रेसकडून सरकारविरोधात जाहीर संताप

गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे आणि ५ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन, असा ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार वसंत धस यांच्या फिर्यादीवरून आर- ोपीविरुद्ध भारतीय हत्यारबंदी कलमान्वये तालुका जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news