Bhokardan green chilli price pudhari photo
जालना

Bhokardan green chilli price : हिरव्या मिरचीचा शेतकऱ्यांना ठसका

भावात घसरण; उत्पादनासह तोडणीचाही खर्च परवडेना, शेतकरी हवालदिल, हमीभाव देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

आन्वा : भोकरदन तालुक्यात सध्या हिरव्या मिरचीच्या भावात घसरण बघायला मिळत आहे. सततचा पाऊस आणि अधिक आवक यामुळे हिरव्या मिरचीचे दर कमी झाले आहेत. सध्या मिरची बाजारात १२ ते १५ रुपये भावापर्यंत मिरचीचे दर असून परिणामी मिरची उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत.

शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीला प्रती किलो फक्त १२ ते १३ रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याची ओरड आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात ग्राहकांना विक्री दर अधिक असला तरीही शेतकऱ्यांना त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत. लाल मिरचीला किंचित स्थिर भाव मिळाल्याने काही शेतकरी तो वापर करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हिरव्या मिरचीच्या किमतीतील खालकोटीमुळे मजुरीचा खर्चही निघत नसेल, ही मोठी समस्या उभी आहे.

या परिस्थितीत जेतक गाना वास्तविक आधारभूत दराची घोषणा करणे सरकारी खरेदी योजनेचा स्वीकारणे आणि बाजारात उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे, तसेच, मजुरांची आवश्यकता' लक्षात घेऊन योग्य योजनांचा अंमल करणे गरजेचे आहे.

सुकुवातीला हिरव्या मिरचीचे भाव चांगले होते. पीकवाढीमुळे आणि मागणीच्या संतुलनामुळे बाजारभाव स्थिर होते. मात्र आवक वाढताच भाव कोसळले सततचा पाऊस तसेच जास्त प्रमाणात मिरची बाजारात येणे, यामुळे भावात मोठी घसरण झाली. सध्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रती किलो १२ ते १५ रुपये दर मिळत आहेत.

मजूर तोडणी - ८००, पोत- ४०, वाहन वाहतूक १००, एकूण खर्च ९४० रूपये भाव मात्र १ हजार २०० रूपये मिळत आहे. जे उत्पादनाचा खर्चही निघवत नाही. यामळे शेतकरी मोठ्या आथिक संकटात आहेत. शासनाच्या वतीने मिरची पिकास हमीभाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदा सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे मिरचीच्या शेतातील रोपांना चुरडा, मुरडा आणि बोकड्या, लाल्या यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामळे मिरचीची चांगली वाढ झाली नाही, आणि पिकाचा दर्जा कमी झाला, उत्पादनावर परिणाम झाला असून उत्पन्नही कमी खर्च जास्त अशी परिस्थितीत निर्माण झाली आहेत.
अरुण पाटील बनकर, शेतकरी
सध्या मिरची पिकाची परिस्थितीत पाहता मिरची पीक उपटून टाकण्याऐवजी काहीच हरकत नाही कारण मजुरी भागापेक्षा जास्त झाली असून लागवड खर्च मेहनत या विचार केला तर भाकरीपेक्षा भोकरे महाग अशी परिस्थितीत निर्माण झाली आहेत.
मंगेश जाधव, शेतकरी कुकडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT