रात्री उशिरापर्यंत डीजे वाजविणे सुरूच pudhari photo
जालना

Bhokardan DJ noise pollution : रात्री उशिरापर्यंत डीजे वाजविणे सुरूच

डीजे वाजविण्याच्या नियमांची नेमकी वेळ किती?

पुढारी वृत्तसेवा

आन्वा ः भोकरदन तालुक्यासह ग्रामीण भागातील मंगल कार्यालये आणि लग्न समारंभांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजे आणि कर्कश संगीतामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिस प्रशासनाने घालून दिलेले नियम स्पष्ट असताना प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. डीजे वाजविण्याच्या नियमांची वेळ नेमकी आहे तरी कोणती, अशा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पोलिस प्रशासनाच्या नियमानुसार संध्याकाळी 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत डीजे व लाउडस्पीकर वाजविण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

त्यानुसार रात्री 10 वाजेपर्यंतच डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरात काही ठिकाणी 12 वाजेपर्यंत डीजे सुरू असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. 10 वाजतानंतर वाजणाऱ्या डीजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.

कोणतेही नियम सर्वासाठी सारखेच असतात. अनेक वेळा सामान्य नागरिकांना नियम काटेकोरपणे लागू केले जातात. मात्र, काही मोजक्या व्यक्तींसाठी हेच नियम लवचिक कसे होतात, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या डीजेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून नियम सर्वांसाठी समान आहेत. असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नियम कागदावर

डीजे वाजविण्यासाठी प्रशासनाला डीजे वाजविण्याची 10 वाजेपर्यंत वेळ असून काही खास लोकांसाठी ही वेळ शिथिल केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भोकरदन तालुक्यात नियम केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT