पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील धामणा धरणामध्ये सध्या केवळ मृतसाठा शिल्लक राहिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक अत्यंत कमी झाली असून, धरणाने तळ गाठला आहे. या धरणातून १२ ते १३ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने या गावांवर पाणी संकट घोंगावत आहे.
भोकरदन तालुक्यातील धामणा धरण हा महत्त्वाचा मध्यम प्रकल्प आहे. या धरणावर सह सुमारे १२ ते १५ गावांची शेती अवलंबून या प्रकल्पावर अवलंबुन आहे. या धरणातूनच या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जातो. मात्र सध्या धरणात केवळ मृत साठा इतकाच मृतसाठा शिल्लक असल्याची विभागाकडून मिळाली आहे.
मृतसाठ्यातील पाणी उपसा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रब्बी हंगाम तोंडावर आला असताना धरणात पाणी नसल्याने गहू, हरभरा या पिकांचे नियोजन कोलमडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी याच काळात धरणात ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
दरम्यान, धरणातील गाळ काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. प्रशासनाने तातडीने मृतसाठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे आणि पुढील पावसाळ्यापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पर्यायी पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेचा प्रश्न
भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात मृत पाणीसाठा असल्याने आगामी आठ महीने परिसरातील गावांसाठी कसौटीचे ठरणार आहे. या धरणातून होणाऱ्या दहा ते बारा गावांसाठी प्रशासनाला पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी लागणार आहे.