Beneficiary's movement to get sand for housing
शहापूर, पुढारी वृत्तसेवा : घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मिळावी या मागणीसाठी स्वतःला गल्हाटी नदीपात्रात वाळूत छातीपर्यंत बुजवुन राजू काकडे यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे.
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी घरकुल अवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू मिळावी या मागणीसाठी स्वतःला गल्हाटी नदीपात्राच्या वाळूमध्ये छातीपर्यंत बुजवून घेत अनोखे आंदोलन सुरू केले आहे.
शासन निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची जबाबदारी तहसील कार्यालयावर सोपवलेली आहे. परंतु तहसील कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्या लाभार्थ्यांनी आर्थिक देवाणघेवाण केली आहे त्याच लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळूसाठी लागणारी पावती दिल्याचा आरोप घरकुल लाभार्थ्यांकडून होत आहे. बाकी सर्व लाभार्थ्यांना मोफत वाळूसाठी तहसील कार्यालयात खेट्या मारव्या लागत आहेत.
घरकुल बांधकामासाठी वाळू मिळावी या मागणीसाठी वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराल्या आहेत. परंतु तहसील कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना १ जुलै रोजी दिले आहे. जोपर्यंत तहसीलदार वाळू देण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.- राजू काकडे, लाभार्थ्याचे बंधू