Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : हॉटेलाच्या आड चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त; गुन्‍हा दाखल

८ जणांविरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना : छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील गेवराई शिवेच्या हद्दीत असलेल्या ‘आकाश हॉटेल अँड लॉजिंग’वर पोलिसांनी धाड टाकून एका कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून, हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि ग्राहकांसह एकूण ८ जणांविरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अंकुश सत्यनारायण दासर यांनी फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक विजय माघे, हॉटेल मॅनेजर/चालक विनोद विथन माघे, काउंटर क्लार्क अर्जुन ऊर्फ शिवा गौरीलाल जोशी, ग्राहक तथा दलाल अक्षय सुधाकर पारघने, आकाश ज्ञानेश्वर देहडे, पवन जनार्दन तालेकर, गोपाळ अशोक होळगे आणि संदीप सुभाष पाजाडे या आठ जणांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (ॲक्ट) कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT