तीर्थपुरी ः चोरट्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त केले. दुसऱ्या छायाचित्रात घटनास्थळी भेट देऊन पाहणी करताना उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ आदी.  pudhari photo
जालना

Jalna robbery : चाकूचा धाक दाखवून दहा लाखांचा ऐवज लंपास

तीर्थपुरी शहरातील एकाच रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली

पुढारी वृत्तसेवा

तीर्थपुरी ः घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरात 10 फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहागड रोडवरील गणपती नगर वस्तीमध्ये चोरट्यांनी हैदोस घातला. एकाच वेळी तीन घरे फोडून आणि रहिवाशांना चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मध्यरात्री चोरट्यांनी नारायण सोनाजी बोबडे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोने-चांदीचे दागिने लंपास करण्यासोबतच त्यांची पत्नी आशाबाई यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे झुंबर व पोत असा दीड लाखांचा ऐवज ओरबाडून नेला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारील अर्जुन आसराजी बोबडे यांच्या घरात प्रवेश करून 5 लाख रुपये रोख आणि दीड तोळे सोन्याचे दागिने पळवले.

चोरी करताना कोणाला बाहेर पडता येऊ नये, यासाठी चोरट्यांनी शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्याचप्रमाणे, कृष्णा लक्ष्मण रंजे यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळे सोन्याचे दागिने (पोत, अंगठी, चैन) आणि 65 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या तिन्ही घरफोड्यांमध्ये मिळून एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ आणि वैशाली पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक पोलिसांनी विविध पथकांमार्फत तपास सुरू केला आहे. या चोरीमुळे तीर्थपुरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • भर वस्तीत अशा चोरीच्या घटना होत असल्याने नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या वतीने रात्री ग्रस्त वाढविण्याची गरज आहे. चोरीच्या घटना होऊ नये, यासाठी पोलिस चोरट्यांना धडा शिकविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT