ZP School : आन्वा जिल्हा परिषद प्रशालेला शिक्षक मिळेना file photo
जालना

ZP School : आन्वा जिल्हा परिषद प्रशालेला शिक्षक मिळेना

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Anva Zilla Parishad School unable to find a teacher

आन्वा, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूल येथील विज्ञान, इंग्रजी व गणित या शिक्षकांचे पदे रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे रिक्त पद येत्या १४ ऑगस्टपर्यंत भरण्यात यावे, नसता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा पालक व शालेय समितीच्या वतीने निवेदनातून देण्यात आला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या चार वर्षांपासून येथील प्रशालेतील शिक्षकांचे पद रिक्त असून याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या प्रशालेतील दोन शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने शिक्षण विभागाने शिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांवर्गातून वारंवार करण्यात आली आहेत. या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशालेत पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून ६०३ विद्यर्थी शिक्षण घेत आहे. २० शिक्षकांची मंजूर आहे. यापैकी १२ शिक्षकांची पदे भरलेली असून तब्बल ८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. विशेष म्हणजे यात विज्ञान, इंग्रजी व गणित या प्रमुख विषयाचे पद रिक्त आहे. येथील रिक्त शिक्षकांच्या पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अगोदर आम्ही आपणास वारंवार पत्र व्यवहार व आंदोलन व निवेदने देऊनसुध्दा आपण येथील रिक्त पदे भरलेली नाही. म्हणून हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंपाल देवचंद कुठांबरे, उपाध्यक्ष गुलाबराव भागाजी चंडोल, कैलास विठ्ठलराव हजारी यांच्यासह पालकांच्या सह्या आहेत.

१४ ऑगस्टची डेडलाईन

आत्मदहनाचा इशारा जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदे १४ ऑगस्टपर्यत भरण्यात यावे. नसता १५ ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT