शहापूरः शहापूर शिवारात कृत्रीम पावसाचा प्रयोग करताना शेतकरी.  (छायाः अशोक गायकवाड)
जालना

Jalna artificial rain experiment : शेतकऱ्यांची हतबलता; प्रयोगासाठी सरसावले अनेकांचे हात

शहापूर येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग; पावसाचा महिनाभराचा खंड, पिके वाया जाण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : अंबड तालुक्यातील शहापूरसह परिसरात पावसाने मोठी ओढ दिली. तब्बल महिनाभराचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावू नये, यासाठी शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र एक कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला.

दरम्यान, पावसळ्याचे तिन महीने उलटुनही शहापूरसह परीसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांत अस्वस्था पसरली आहे. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव, नदीनाल्यांना देखील पाणी आले नाही. परिणामी, सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असून, शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहे.

शेतकऱ्यांनी असा केला प्रयोग

शहापूर येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा पारंपरिक प्रयोग शहापूर येथील शेतकऱ्यांनी केला. या प्रयोगासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे जाड मिठ, रूट व वडाचा पाला वापरण्यात आला आहे. शास्त्रीय दृष्ट्या पाऊस पाडण्यासाठी आकाशातील ढगाची उपलब्धता व घनता, हवेतील आर्द्रता, तापमान व वाऱ्याचा वेग वातावरणातील आदी घटक अनुकूल असणे आवश्यक आहे. त्यामुळे शहापूर येथील शेतकऱ्यांकडुन पारंपारिक पध्दतीने कृत्रित पावसाचा प्रयोग करण्यात आला.

आभाळाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

  1. गल्हाटी प्रकल्पातील मोकळ्या ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला. शहापूरसह परीसरात पडलेला पावसाचा मोठा खंड व त्यामुळे सुकु लागलेल्या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी शेतकरी एकत्र आले. कृत्रिम पाऊस पाडण्याचा पारंपरिक प्रयोग करण्यात आला आहे.

  2. तीन महिने उलटूनही मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट होणार असल्याची तर काही ठिकाणी पिके वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT