शहापूर : शॉर्टसर्किट झाल्यामुळे ऊस जळून खाक झाला आहे.  pudhari photo
जालना

Jalna Short Circuit Farm Fire : शॉर्टसर्किटमुळे अडीच एकर ऊस जळून खाक

जवळपास ३ लाखांचे नुकसान, आग आटोक्यात

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील शेतकऱ्याचा शॉर्टसर्किटमुळे अड़ीच एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वेळीच आग लागलेल्या उसाच्या शेतातीत बांधावरील ऊस तोडून बाजूला टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पिठोरी सिरसगाव येथील शेतकरी द्वारकादास विठ्ठलराव डुचे यांच्या गट क्रमांक ३ मधील एक एकर तर अनिल कल्याण माने यांचा दिड एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. गट क्रमांक ३ मध्ये महावितरणच्या तारा मध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे सदर उसाला आग लागल्याची माहिती आहे.

उसाला आग लागल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येई पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. सदर क्षेत्र गावा शेजारी असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली आहे. पिठोरी सिरसगावसह परिसरात आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT