Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : मोटारसायकल चोर जेरबंद; दोन दुचाकी जप्त

अंबड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

जालना : अंबड परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, १ सप्टेंबर रोजी मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमाची माहिती पोलिसांना मिळाली. लक्ष्मण पिंटू पवार (वय २१, रा. कुंभारपिंपळगाव तांडा, ता. घनसावंगी) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुंभारपिंपळगाव परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून दोन्ही चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे तसेच परतूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस पथकाची कामगिरी

पोलिस अधीक्षक तेजस्वी सिंह संधू व अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच पोलिस अंमलदार प्रभाकर वाघ, कैलास खांड, लक्ष्मीकांत ओडपे, सुधीर वाघमारे, ईश्वर पटेल, सागर बाबीकर, दत्ता वायुळे, कैलास चव्हाण, भागवत खरात, सोपान क्षीरसागर व अशोक जाधवर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT