Sambhajinagar Crime : चोरट्यांचा धुमाकूळ; शहरात सहा ठिकाणी चोरी अन् लुटमारीच्या घटना

मॉर्निंग वॉक, भरबाजार ते हॉस्टेल, घरांपर्यंत चोरीचे सत्र; पोलिसांची गस्त कुचकामी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच असून, पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत महिलांचे दागिने लांबवणे, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धांचे दागिने ओरबाडने, बंद दुकाने फोडण्यासह हॉस्टेल आणि घरातूनही चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी आणि सोमवारी उघडकीस आलेल्या वेगवेगळ्या सहा घटनांमध्ये भुरट्या चोरट्यांपासून ते साखळीचोरांपर्यंत सर्वांनीच हातसफाई करत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे गंठण हिसकावले

कांचनवाडी येथील सुमंगल सोसायटीजवळ रविवारी (दि. ३०) सकाळी ७:३० वाजता ही घटना घडली. शर्मिला विपिनचंद्र वाणी (७५, रा. कांचनवाडी) या पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. पल्सर बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या पतीला 'काटे यांचा पत्ता' विचारण्याच्या बहाण्याने थांबवले आणि काही कळण्याच्या आत मागे बसलेल्या चोरट्याने शर्मिला यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडून पळ काढला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News
Sambhajinagar News : दंडमाफीचा निर्णय, गुंठेवारी विभागात गर्दी

गर्दीचा फायदा घेत साडी सेंटरमध्ये दागिन्यांवर डल्ला

रंगार गल्लीतील 'खजाना साडी सेंटर' मध्ये साड्या खरेदीसाठी आलेल्या दुर्गादेवी गोविंद यादव (३७, रा. घाणेगाव) यांच्या गळ्यातील पोथीचा धागा तोडून चोरट्याने ७ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल लंपास केले. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने ही हातसफाई केली. सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल असून हवालदार सुधाकर मिसाळ तपास करत आहेत.

ब्युटी पार्लरमध्ये विसरलेली सोन्याची अंगठी गायब

पडेगाव येथील शीतल धनेश्वर (२७) या शनिवारी (दि. २९) दुपारी मुकुंदवाडीतील काजल ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. व्हॅक्स करताना त्यांनी साडेचार ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून टेबलवर ठेवली होती. त्या अंगठी विसरून घरी आल्या, मात्र परत जाऊन पाहिल्यास अंगठी गायब होती. पार्लरचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकान फोडून देशी दारूचे बॉक्स अन् रोकड लंपास

जय टॉवर येथील ललिता परदेशी यांच्या देशी दारूच्या दुकानाचे शटर टॉमीने उचकटून चोरट्याने ७ बॉक्स (४८ बॉटल) आणि गल्ल्यातील १२ हजार ५०० रुपये रोख लंपास केले. रविवारी मध्यरात्री ही घरफोडी झाली. व्यवस्थापक सुरेश तरटे यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाईल चोरीला

उस्मानपुरा येथील संत एकनाथ नगर रोडवरील कामेल हॉस्टेलमध्ये चोरट्याने घुसून विद्यार्थ्यांचा ऐवज लांबवला. शनिवारी (दि. २९) घडलेल्या या घटनेत वेदांत मुकेश ढोके (१९) आणि योगेश गटकळ यांचा १ लॅपटॉप, ३ मोबाईल, एटीएम कार्ड आणि कॉलेजची कागदपत्रे असा ३९ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणीही वेदांतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Gram Panchayat Officer Attack: जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामसेवकांचा मूकमोर्चा; शिवरे ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा नोंदविला निषेध

घरकाम करणाऱ्या महिलेनेच लांबविले सोन्याचे कडे

उल्कानगरीतील अमरजा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सिंधू रमेश (२७) यांनी बेडच्या बाजूला ठेवलेले ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कडे घरकाम करणाऱ्या महिलेनेच चोरल्याचे उघडकीस आले आहे. १७ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी संशयित रेणुका भागवत (रा. झेंडा चौक, मुकुंदवाडी) हिच्याविरुद्ध सोमवारी (दि. ३१) जवाहर नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news