Robbery Case : नवीन मोंढ्यात गोडाऊनचे शटर वाकवून २ लाख ३८ हजारांचा शेतमाल लंपास pudhari photo
जालना

Robbery Case : नवीन मोंढ्यात गोडाऊनचे शटर वाकवून २ लाख ३८ हजारांचा शेतमाल लंपास

गोदामातून सोयाबीन आणि ज्वारीचे १०१ कट्टे चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Agricultural produce worth ₹2.38 lakh stolen from a warehouse in the New Mondha area after bending the shutter

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील नवीन मोंढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी भुसार अडत व्यापाऱ्याच्या गोदामाला (गोडाऊन) लक्ष्य करत लाखो रुपयांचा शेतमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनचे पाठीमागील शटर बळजबरीने वाकवून आत प्रवेश केला आणि कडेकोट बंदोबस्तात असलेले सोयाबीन व ज्वारीचे एकूण १०१ कट्टे लंपास केले. या धाडसी चोरीमुळे मोंढा भागातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दुपारी माल काढण्यासाठी गेल्यावर प्रकार उघड मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, संभाजीनगर (बालाजी मंदिराच्या पाठीमागे, जालना) येथील रहिवासी असलेले आनंद ताराचंद सेठिया (वय ७० वर्ष) हे नवीन मोंढा भागात २००२ पासून दुकान क्र. ३१ मध्ये भुसार आडतचा व्यापार करतात.

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल ते आपल्या '३१ एफ' क्रमांकाच्या गोदामात साठवून ठेवतात. त्यांच्या गोदामात सोयाबीन आणि ज्वारीचे कट्टे साठवलेले होते. बुधवार, दि. १० जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सेठिया हे नेहमीप्रमाणे गोदामातील माल विक्रीसाठी काढण्यासाठी गेले होते. त्यांनी गोडाऊन उघडले असता, आतील शेतमालाचे काही कट्टे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने सेठिया यांनी गोदामाची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी गोडाऊनचे मुख्य कुलूप शाबूत होते, मात्र पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर चोरट्यांनी ताकद लावून वाकवले होते. याच वाकवलेल्या शटरमधून आत शिरून अज्ञात चोरट्यांनी गोदामातील शेतमाल लंपास केला.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

याशिवाय तुरीचेही काही साहित्य मिळून असा एकूण २ लाख ३८ हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याचे प्राथमिक तक्रारीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी व्यापारी आनंद ताराचंद सेठिया यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता विविध कलमान्वरये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत असून मोंढा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा सुगावा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT