Crime News pudhari photo
जालना

Crime News : 'न्यू राधिका लॉज अँड बार'मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई

तीन महिलांची सुटका; लॉजमधून कोयता आणि चाकू जप्त

पुढारी वृत्तसेवा

Action on prostitution going on in 'New Radhika Lodge and Bar'

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरील बदनापूर येथील 'न्यू राधिका लॉज अँड बार'मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवार, (दि. १२) धाड टाकून पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत ३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, लॉजमधून घातक धारदार शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच लॉजचा मालक आणि चालक (मॅनेजर) घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बदनापूर येथील 'न्यू राधिका लॉज अँड बारं'चा मालक विठ्ठल रामभाऊ माने हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर, पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात लॉजचा मालक विठ्ठल रामभाऊ माने आणि चालक उमेश पाटील (रा. न्यू राधिका लॉज अँड बार) हे दोघेही पोलिसांना पाहून पसार झाले. या कारवाईत पोलिसांनी ३ पीडित महिलांची सुटका केली. तसेच, मॅनेजरच्या काउंटरमधून ८ हजार ५८० रुपयांची रोख रक्कम, एक घातक धारदार कोयता आणि एक चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महिलांची सुटका केल्यानंतर, प्रभारी अधिकारी पो. नि. सोमनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरार आरोपींविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम (पीटा अॅक्ट) १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि सोबतच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पो. नि. सोमनाथ शिंदे, सपोनि रखी जोशी, सपोनि संजय गवळी, पोहेकॉ कृष्णा देटे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरतमल, निमा घनघाव, ज्योती राठोड आणि चालक सपोउपनि संजय कुलकर्णी यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT