जालना : येथील अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय व अंबड पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करुन अंबड शहराजवळील बीड रोडवर कंटेनरचा पाठलाग करुन 43 लाख 8 हजार 250 रुपयांच्या गुटख्यासह 30 लाखांचा कंटेनर असा 73 लाख 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला.
अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, प्रतिबंधीत गुटखा घेऊन जाणारे वाहन हे जालना ते बिड रोडने जात आहे.या माहीतीवरुन अपर पोलीस अधिक्षक नोपाणी यांनी कार्यालयातील पोलीस उप निरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी निखिल गायकवाड, प्रताप सुंदडे, विशाल सोळुंके, अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ठुबे, जमादार यशवंत मुंडे, पोलिस कर्मचारी अरुण मुंडे, जमादार दिपक चव्हाण यांच्या पथकास पाठवले.त्यांनी संशयीत वाहनाचा जालना विड रोडने पाठलाग करुन संशयीत कंटेनर (क्र. 18 2350) हा अंबड शहरातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंप ते हॉटेल भारत दरम्यान पाठलाग करुन पकडला.
यावेळी कंटेनर चालक शिवम जादो देशमुख (रा.मुलताई जि. बैतुल राज्य मध्यप्रदेश) यास थांबवुन वाहनाची तपासणी केली असता कंटेनर मधे राजनिवास सुंगधित पान मसाला, विमल पान मसाला, रजनिगंन्धा, -120 तसेच प्रिमिअम जाफरानी जर्दा तंबाकुचा 43 लाख 08 हजार 250 रुपयांचा गुटखा व 30 हजार रुपये किंमतीचे कंटेनर 22 हजाराचे दोन मोवाईल असा 73 लाख 30 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी गुटखा व कंटेनर आरोपीसह ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात लावला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ , पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस उपनिरीक्षक ठुबे, पोलिस कर्मचारी यशवंत मुंडे, जमादार दिपक चव्हाण, पोलिस कर्मचारी अरुण मुंडे, नखिल गायकवाड, प्रताप सुंदडे, विशाल सोळुंके यांच्यासह इतरांनी केली आहे.
गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल
शहरातील चंदनझिरा पोलिसांनी राजुर रोडवर एका कारमधुन जालना शहरात विक्रीसाठी येणारा गुटखा पकडला.या कारवाईत विविध कंपन्याच्या गुटख्यासह 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजुर रोडवर छापा टाकुन टाटा इंडीगो कार(एमएच-02- बीआर-7497 मधुन मिराज, बाबा, रजनिगंधा, राजनिवास, सिग्नेचर, आरएमडी या कंपनींचा प्रतिबंधीत 12 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कारमधुन मोहंमद तौसीफ अब्दुल रज्जाक ( रा. टड्डुपुरा जालना) व अब्दुल खालेद अब्दुल कादर ( रा. बागवान मशीद जवळ जुना जालना )यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.