Jalna Robbery Case : जबरी चोरीतील आरोपी अवघ्या सहा तासांत पकडले file photo
जालना

Jalna Robbery Case : जबरी चोरीतील आरोपी अवघ्या सहा तासांत पकडले

दोन आरोपींसह कार, पिस्तूल अन् काडतुसे पोलिसांनी केले जप्त

पुढारी वृत्तसेवा

Accused in robbery case nabbed within just six hours

जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या सहा तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेली कार, गुन्ह्यात वापरलेली कार तसेच पिस्तूल, तलवार व जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गहिनीनाथ नगर येथील संगम हॉटेल परिसरात २ जुलै २०२६ रोजी फिर्यादीला चारचाकी वाहनात बसवून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याची स्विफ्ट डिझायर कार व इतर साहित्य जबरीने हिसकावून नेण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने तपास सुरू केला.

गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर परिसरातून आकाश नाना त्रिभुवन (वय २७) व पवन प्रकाश मिरजकर (वय ३०) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेली स्विफ्ट डिझायर कार, गुन्ह्यात वापरलेली आय-२० कार, एक पिस्तूल, एक लोखंडी तलवार आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक. तेघबीर सिंह संधू व अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात शोध मोहीम राबविल्याने यश आले.

इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता

गोंदी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींकडुन जप्त करण्यात आलेले पिस्तूल त्यांनी आणले कोठुन याचाही पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT