Navaratri Festival : रांगोळीतून साकारली देवीची प्रतिकृती; आठ तासांचे परिश्रम file photo
जालना

Navaratri Festival : रांगोळीतून साकारली देवीची प्रतिकृती; आठ तासांचे परिश्रम

मत्स्योदरीच्या नवरात्रोत्सवात रांगोळीने वेधले भाविकांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

A replica of the goddess made from rangoli; the result of eight hours of hard work

अंबड पुढारी वृत्तसेवा : अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिरासमोर साकारण्यात आलेली देवीची आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. कलाशिक्षक सुभाष श्रीमंत घुले यांनी तब्बल पाच किलो रांगोळीचा वापर करून आठ तासांच्या परिश्रमातून देवीची सुंदर प्रतिकृती साकारली आहे.

रंगांच्या सुरेख संगमातून साकारलेल्या कलाकृतीला भाविकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. या मत्सोदरी देवीच्या पाचव्या माळे निमित्त देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. गुरुवारी मंदिरासमोरील रांगोळी पाहण्यासाठी अनेक भाविक थांबत होते. यावेळी रांगोळीचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्याबरोबरच सेल्फी घेण्याचा मोहही अनेकांना आवरत नव्हता. विशेषतः महिला आणि युवतींची याठिकाणी मोठी गर्दी दिसून येत होती.

कलेचे कौतुक

कलाशिक्षक सुभाष घुले आणि कलाशिक्षक रवींद्र जामदार हे गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवात मंदिरासमोर विविध आकर्षक रांगोळ्या साकारून आपली कला देवीचरणी अर्पण करतात. यंदाही घुले यांनी साकारलेल्या रांगोळीने भाविकांची मने जिंकली असून, त्यांच्या कलाकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT