Jalna News : शाळेच्या मैदानावर आढळले लिंबू अन् पासपोर्ट

विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
Jalna News
Jalna News : शाळेच्या मैदानावर आढळले लिंबू अन् पासपोर्टfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna News: Lemon and passport found on school playground

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खासगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात लिंबू, काळ्या कपड्यांची बाहुली आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आढळल्याने खळबळ उडाली. या वस्तू नेमक्या कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवल्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

शाळेच्या परिसरातील संशयास्पद प्रकार समोर आल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेत कॅमेरे बसविण्यात आले असले, तरी ते प्रत्यक्षात सुरू आहेत का? संबंधित परिसराचे चित्रीकरण झाले आहे का? तसेच रेकॉर्डिंग उपलब्ध आहे का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पालकांनी घटनास्थळाची पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी संतोष कोल्हे लिंबाजी पा. लोखंडे, शेख रशीद, उपसरपंच डिगांबर लोखंडे, सोनाजी कानडे, भानुदास लोखंडे, अनिल जाधव, नितीन मगर, बबन लोखंडे, गफुर शहा, अंकुश बकाल, गणेश लोखंडे ग्रामस्थ उपस्थित होते.

हा प्रकार शाळेच्या मैदानवर अमावस्येच्या दिवशी घडल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्या दिवशी शाळेत वीजपुरवठा नसल्याने नेमका प्रकार कोणी केला, हे लक्षात आले नाही. संबंधित जागेजवळ झाडे असून तेथे माकडांचा वावर असतो. तसेच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे खराब असल्याने या घटनेचे चित्रीकरण उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रकार कोणी केला, हे सांगता येत नाही.
- किशोर तबडे, मुख्याध्यापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news