Livestock Farmers : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी file photo
जालना

Livestock Farmers : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

मुरघास संयंत्र वाटप योजना : खुल्या ५०, तर अनुसूचित जाती-जमातींसाठी ७५ टक्के अनुदान

पुढारी वृत्तसेवा

A Golden Opportunity for Livestock Farmers to Become Entrepreneurs

जालना, पुढारी वृत्तसेवा : पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पशुपालकांना स्वावलंबी व उद्य-ोजक बनविण्याच्या उद्देशाने शासनामार्फत 'मुरघास संयंत्र वाटप योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पात्र पशुपालक तसेच शेतकरी समुहगटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभाथ्यर्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर व मुरघास बेलर संयंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत मर्यादा २६ लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान (कमाल रु. १३ लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदान (कमाल रु. १९.५० लाख) देण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करताना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी कार्ड, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र अथवा स्वनिधी उपलब्ध असल्यास त्यासंबंधी बँक स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र तसेच बचत गट सदस्यांनी संबंधित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

लाभ घेणाऱ्या संस्थांकडे किमान ५० शेतकरी सदस्य असणे, किमान ५ लाख रुपयांचे भागभांडवल असणे, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे व संस्था नफ्यात असणे आवश्यक आहे. पात्र समुहगटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. अनुदानाची रकम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

लाभासाठी पात्रता निकष

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान १० मोठे पशुधन किंवा १०० शेळ्या / मेंढ्या असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या मालकीचा किमान ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रियेत अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी ५ टक्के तर महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.

समूहांनी लाभ घ्यावा पशुपालकांना चारा टंचाईवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पात्र पशुपालक व शेतकरी समूहगटांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा.
डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT