शेतकऱ्याची कन्या बनली न्यायाधीश file photo
जालना

शेतकऱ्याची कन्या बनली न्यायाधीश

आरती सोनवणे यांची न्यायदेवतेच्या दरबारात झेप

पुढारी वृत्तसेवा

A Farmer's Daughter Becomes a Judge

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील लिहा येथील आरती ज्ञानेश्वर सोनवणे हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी पदी निवड झाली आहे. या यशामुळे केवळ सोनवणे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण भोकरदन तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर गाजले आहे.

आरती सोनवणे यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय जिद्दीचा राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच हिसोडा (ता. भोकरदन) येथे झाले. जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिसोडा येथे ८ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शालेय जीवनापासूनच त्या अत्यंत हुशार आणि आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. आरतीचे वडील ज्ञानेश्वर सोनवणे हे अल्पशिक्षित (१० वी उत्तीर्ण) असून आई केवळ ४ थी उत्तीर्ण आहे. कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच, त्यात शेतीवर उदरनिर्वाह. मात्र, मुलीने शिकावे आणि मोठे व्हावे ही त्यांची मनापासून इच्छा होती.

आरती यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांचे काका न्यायाधीश सुधाकर नारायण सोनवणे यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी आपल्याकडे बोलावून घेतले. काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे आरती यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई येथे एमपीएससी अंतर्गत होणारी न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. सर्व स्तरातून आरती हिचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT