Marigolds : शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली झेंडूची शेती file photo
जालना

Marigolds : शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली झेंडूची शेती

दिवाळीत चांगल्या भावाची शेतकऱ्यांना अपेक्षा, फुलांची तोडणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

A farmer successfully cultivated marigolds even during a drought

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके वाया गेली असताना पारध येथील एका जिद्दी शेतकऱ्याने दुष्काळपरिस्थितीवर मात करत झेंडू फुलाची यशस्वी शेती फुलवली आहे. रस्त्याच्या कडेला असलेले केशरी-पिवळ्या झेंडूने बहरलेले शेत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फुल उत्पादक शेतकऱ्याना दिवाळीत चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरातया वर्षी दुष्काळ जन्य यंदा पाऊस कमी झाल्याने सोयाबीन, कापूस, मका यासारखी पारंपरिक पिके हातची गेली. अशा परिस्थितीत पारध येथील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत कमी पाण्यावर येणाऱ्या झेंडूच्या शेतीचा प्रयोग केला. ठिबक सिंचनाच्या सहाय्याने त्यांनी सुमारे एक एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड केली.

आज रोजी शेतात भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या झेंडू फुलांनी अक्षरशः गालिचा अंथरला आहे. फुलांचा दर्जा आणि आकार अतिशय चांगला असून उत्पादनही समाधानकारक मिळत आहे. दिवाळी सण तोंडावर आला आहे. दिवाळीत फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या फुलांना चांगला भाव मिळेल आणि दुष्काळात झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

पारंपरिक पिके अडचणीत आली असताना फुलशेतीसारखा जोडव्यवसाय शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ठरत आहे. कमी खर्च, कमी पाणी आणि कमी कालावधीत चांगला नफा देणारी ही शेती इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. यंदाच्या दिवाळीत चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

या वर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मी एक एकर झेंडू फुलाची शेती लागवड केली आहे. आतापर्यंत चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च परतु दिवाळीमध्ये चागला भाव मिळेल आशी अपेक्षा आहे.
ज्ञानेश्वर लोखंडे, पारध शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT