Jalna Drought : दुष्काळामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

पिके हातची गेल्याने लागवड खर्चही निघाला नाही
Jalna Drought
Jalna Drought : दुष्काळामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातfile photo
Published on: 
Updated on: 

Due to the drought, farmers' Diwali this year is in darkness

डोणगांव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यासह ग्रामीण भागातील यंदा कोरडा दुष्काळ परिस्थितीमुळे विहीर, नदी-नाले, पाझर तलाव कोरडेठाक पडले आहे. पाण्याअभावी कापूस, सोयाबीन, मका, तूर भाजीपाल्यासह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. लागवड खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याचे दिसून येत आहे.

Jalna Drought
Jalna Silk Saree : जालन्याच्या सिल्क साड्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पिके चांगली दिसत असताना पावसाने मोठी उघडीप दिली. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिकांना मोठा फटका बसला. अनेक भागांत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, काही शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित धान्याऐवजी केवळ भुसा आणि पशुखाद्यच उरल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

दिवाळी म्हटली की ग्रामीण भागात नवीन कपडे, फराळ, मिठाई, फटाके, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र यंदा आर्थिक अडचणीमुळे अनेक कुटुंबांकडून केवळ गरजेपुरतीच खरेदी केली जात आहे. शेतमालाचे घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी आहे. त्यामुळे दिवाळीचा उत्साह असला तरी खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे.

Jalna Drought
Aadhaar Seva Kendra : आधार सेवा केंद्राचा मनमानी कारभार

दुष्काळाची झळ केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने बाजारपेठेतील खरेदीवर परिणाम झाला आहे. कपडे, किराणा, मिठाई, फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दिवाळीच्या साहित्याच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत होणारी मोठी उलाढाल यंदा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे.

साधेपणाने सण साजरा

दरवर्षी दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच ग्रामीण बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीन फुलून जातात. यंदा मात्र अनेक ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या आणि त्यांच्या खरेदीचे प्रमाण दोन्ही कमी झाल्याचे चित्र आहे. 'पहिले घर चालवायचे की दिवाळी साजरी करायची,' असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे नवीन कपडे, महागड्या वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात फराळ करण्याऐवजी उपलब्ध परिस्थितीत साधेपणाने सण साजरा करण्याकडे कल वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.