Bribe Case : भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात  pudhari photo
जालना

Bribe Case : भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

हद्द कायम प्रकरणी 30 हजारांच्या लाचेची केली मागणी

पुढारी वृत्तसेवा

A clerk from the land records office was caught in the ACB's trap.

जालना, पुढारी वृत्तसेवा: शेतजमिनीची हद्द कायम करून मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय, केज येथील लिपिकाला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, दि. 29 डिसेंबर रोजी केज - बीड रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोरील चहाच्या टपरीजवळ करण्यात आली.

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी केज येथील भूमी अभिलेख कार्यालयात हद्द कायमसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार दि. 18 डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली. मोजणीनंतर शेतजमिनीचे क्षेत्र कमी न करता फाईल मंजूर करून देण्यासाठी लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे (वय 50, वर्ग3) यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करताना आरोपीने यापूर्वी 5 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले असून उर्वरित 25 हजार रुपये घेण्यास संमती दर्शविल्याचे पंचांसमक्ष निष्पन्न झाले.

सापळा कारवाईदरम्यान आरोपीने उर्वरित रकमेपैकी 10 हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अंगझडतीत 10 हजार रुपयांची लाच रक्कम, 5 हजार 500 रुपये रोख, विवो मोबाईल व दोन अंगठ्या मिळून आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT