Jarange Patil : जरांगे यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत pudhari photo
जालना

Jarange Patil : जरांगे यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत

मंगळवारपासून आठ सलाईनद्वारे उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

A 24-hour medical team is working to monitor Jarange's health

वडिगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे अन्न व पाण्याविना उपोषण करीत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत आहेत. काल जरांगे पाटील यांना सात सलाईन लावण्यात आल्या. आज दुपारीही त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना एक सलाईन लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

वैद्यकीय पथकाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता त्यांची वैद्यकिय तपासणी केली. यावेळी त्यांची प्रकृती सर्वसाधारण मध्यम स्वरूपाची असल्याचे आढळले. त्यांना ८ सप्टेंबर रोजी सात बाटल्या आयव्ही फ्ल्यूड सलाईन देण्यात आले. तसेच आज दुपारीही जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना १ सलाईन लावण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

उपोषणाचा बारावा दिवस असल्याने संभाव्य आरोग्यविषयक धोके श्री. जरांगे यांना समजावून सांगण्यात आले आहेत. तथापि, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास संमती दिलेली नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT