Snakebite : सर्पदंश झालेल्या ५१० जणांना मिळाले जीवदान File Photo
जालना

Snakebite : सर्पदंश झालेल्या ५१० जणांना मिळाले जीवदान

जिल्हा रुग्णालयात ४७०, पीएचसी, खासगीत ४० रुग्णांनी घेतले उपचार

पुढारी वृत्तसेवा

510 people who were bitten by snakes were saved

संघपाल वाहुळकर

जालना : जिल्ह्यात मागील दीड वर्षाच्या कालावधीत सर्पदंश झालेल्या ५१० जणांना जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय ४७० तर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह खासगी रुग्णालयात ४० रुग्ण दाखल करण्यात आले होते.

सर्पदंश झालेल्या रुग्णांवर प्रामुख्याने एए-सव्ही इंजेक्शनद्वारे उपचार करण्यात आल्याने सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचू शकले. दरम्यान, अशा रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालयात या औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

साप म्हणजे विषारी, जीवघेणा प्राणी असा सर्वसाधारण समज आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात असून, त्यामध्ये बहुतांश लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे आहेत. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. अशा वेळी सापाने दंश केल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र, प्रत्येक साप विषारी असतो असे नाही. महाराष्ट्रात सापांच्या ५२ प्रजाती आहेत.

त्यामध्ये केवळ १२ प्रजाती विषारी आहेत, तर ४० जात्ती चिनविषारी आहेत. तसेच नागरी वस्तीकडे आपले भक्ष्य शोधण्यासाठी येणाऱ्या सापांच्या जाती या चार असून, त्यामध्ये घोणस, फुरसे, नाग आणि मण्यार यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणताही साप चावल्याने मृत्यू होतो असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे सर्पविषयक तज्ज्ञ आणि सर्पमित्रांकडून सांगितले जाते. जिल्ह्यात दीड वर्षात ५१० जणांना सर्पदंश झाला होता. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सर्पदंश झालेल्या ४७० जर्णाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित ४० रुग्णांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद, ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ५१० जणांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना वाचवण्यात यश आले.

अशी घ्यावी काळजी

घराच्या परिसरात साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवले पाहिजे. प्रत्येक साप विषारी नसतो. त्यामुळे सापांना मारणे टाळावे. शेतातील साप शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. सर्पदंश झाल्यावर त्वरित रुग्णालयात जावे. तंत्र, मंत्र किंवा मांत्रिकाडून विष उतवण्याचे प्रकार करू नये.

प्रत्येक साप हा विषारी नसतो

ग्रामीण भागात जुलै 6 ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत साप चावण्याचे प्रमाण अधिक असते. शेतकऱ्यांना साप चावल्यास ते घाबरून जातात. मात्र, प्रत्येकच साप हा विषारी नसतो. आपल्याकडे कोब्रा, मण्यार, फुरसे, घोणस हेच साप विषारी असून, ते क्वचितच आढळून येतात.
रामेश्वर शहा, सर्पमित्र, जालना

अंधश्रद्धा बाळगणे अयोग्य

साप चावला म्हणजे मृत्यू होत नाही. प्रत्येकच साप हा विषारी नसतो म्हणून रुग्णांनी साप चावला म्हणजे तांत्रिक-मांत्रिकाकडे न जाता २४ तासांच्या आत रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात एए-सव्हीचे इंजेक्शन उपलब्ध असून, यासह योग्य उपचारांमुळे सर्पदंशाचा रुग्ण त्वरित बरा होतो.
- महेश गायकवाड, ब्रदर, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT