Encroachment : शहरातील ४० अतिक्रमणांवर हातोडा; महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम file photo
जालना

Encroachment : शहरातील ४० अतिक्रमणांवर हातोडा; महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

पुढारी वृत्तसेवा

40 Encroachments in the City Demolished; Municipal Corporation's Anti-Encroachment Drive

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दि. ९ रोजी राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत शहरातील गरीबशहा बाजारासह बसस्थानक मार्गावरील सुमोर ३५ ते ४० अतिक्रमण हटविले आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

दरम्यान, शहरातीलगरीब शहा बाजार भागातील विविध दुकानदारांनी रस्त्यावर पक्की शेड उभारुन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये जा करताना अडचण निर्माण होत होती. येथील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर बसस्थानक परिसरात अतिक्रमण देखील काढण्यात आले.

महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेस शहा बाजारा पासून सुरुवात करण्यात आली. परिसरातील ३५ ते ४० अतिक्रमणे काढण्यात आले.

यावेळी आयुक्त अंजली शर्मा, नगर रचनाकार सौरभ कांबळे, त्रिंबक कांबळे, विजय फुलंब्रीकर, बी.सी. चव्हाण, सॅमसंग कसबे, तेजस्विनी शिंदे, मोहन जामदार, व इतर सफाई अधिकारी व कर्मचारी हजर होते. अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यामुळे नागरिकांनी अतिक्रमण कर नये, असे आवाहन आयुक्त अंजल शर्मा यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT