Shahagad action against sand smugglers
अंबड : मौजे वाळकेश्वर व शहागड येथील गोदावरी नदी पात्रात धाड टाकून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या ३१ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि.८) पहाटे अंबडचे तहसीलदार तथा दंडाधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने केली.
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणारे ट्रॅक्टर, वाळू माफियांना लोकेशन देणारे ८ व्यक्ती, त्यांचे ९ मोबाईल, २ मोटरसायकली व ४ कार जप्त केल्या आहेत. संबंधित वाळू माफियांना लोकेशन देणाऱ्या नऊ व्यक्तींचा जबाब नोंदवला असून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.
शहागड येथील गोदावरी नदी पात्राची पाहणी २९ एप्रिलरोजी करण्यात आली होती. पात्रामध्ये जुन्या पुलाच्या बाजुला व महादेव मंदिराच्या जवळ, समर्थ कारखाना पाणीपुरवठा ठिकाणी अवैधरित्या वाळूचे उत्खनन केल्याचे दिसून आले. २०० ब्रास वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. यामुळे शासनाचा सुमारे १ कोटीचा महसुल बुडालेला आहे.
विजय बन्सी पुर्भे, शाहरुख मकबुल शहा, सय्यद सोहेब रफोय्योद्दीन, संदिप रमेश धोत्रे, अविनाश बबन हारेर, जुनेद चाँदमिया तांबोळी, योगेश मोहन परदेशी , इरफान तांबोळी, अमेर गुलाब बागवान, इद्रीस रहिम शहा, दत्तात्रय प्रल्हाद ढगे, इमतियाज बाबू मनियार,नितीन मोहन परदेशी, अयाज हनिफ बागवान, चंद्रकांत सर्जेराव लव्हाळे, सचिन भैय्यालाल परदेशी, मुक्तार अकबर शहा, नवीद चाँदमियाँ तांबोळी, गणेश अप्पा कूकरे समिय्योद्दीन छोटूमिया शेख (रा.वाळकेश्वर), अजय प्रकाश निकाळजे (रा.वाळकेश्वर), भैय्या मधूकर येटाळे, गणेश शांतीलाल उमरे, संजय लक्ष्मण रोटेवाड, अजय हरीचंद्र परदेशी, योगेश जगनन्नाथ उमरे, बाबासाहेब आसाराम येटाळे, इमरान महेबुब खान पठाण, संजय सुभाष उमरे, (सर्व रा.शहागड)