

भोकरदन : पेरजापुर येथे विहिरीत दगड फोडण्याचे काम करत असताना ब्रेकरच्या वायरचा शॉक लागून नंदू सिताराम मतलबे (वय 27) रा, कठोरा जयपुर यांचा मृत्यू झाला. विहिरीतून काढून त्यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाली कासोद यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीपत्रकावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार सुनील गांगे हे करीत आहे.
भोकरदन येथे मुख्य बाजारपेठेत गंगासागर मोबाईल शॉपी या दुकानासमोर बऱ्याच वेळ बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या रखमाजी रामराव बावस्कर (वय 55) रा. देहड यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भोकरदन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीपत्रकावरून या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके ही करीत आहे.