घाणेवाडी पाईपलाईनचे २० फुटी लोखंडी गडर हस्तगत file photo
जालना

Jalna Crime News : घाणेवाडी पाईपलाईनचे २० फुटी लोखंडी गडर हस्तगत

चंदनझिरा पोलिसांची कारवाई, चोरटे फरार

पुढारी वृत्तसेवा

20-Foot Iron Girders from Ghanewadi Pipeline Seized

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी पाईपलाईनचे गडरसह इतर साहित्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घाणेवाडी ते जलश-द्धीकरण केंद्रापर्यंत येणाऱ्या पाईपलाईनवरील कन्हैया नगर नाल्या जवळील चोरीला गेलेले २० फूट लांबीचे लोखंडी गडर पोलिसांनी जप्त केले आहे.

जालना शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलवाहिनीवरील कन्हैया नगर भागात असलेल्या नाल्यावरील २० फुटाचे लोखंडी गडर २४ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. सार्वजनिक मालमत्तेची आणि पाणीपुरवठा योजन तील महत्त्वाच्या साहित्याची चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा तपास करत असताना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत सतर्कता दाखवली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे १४ मार्च रोजी पोलिसांनी सदर चोरीला गेलेले लोखंडी गडर शोधून काढले. हे गडर सध्या चंदनझिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, या चोरीमागे नेमकी कोणती टोळी आहे, याचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT