180 extra ST buses to run for the Pandharpur pilgrimage
जालना, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीसाठी पंढरपूर यात्रेनिमित्त जालना एसटी विभागाच्यावतीने २० ते ३० जुलै या कालावधीत १८० जादा बसेस सोडण्यात येणार आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा शनिवार (२५) जुलै हा प्रमुख दिवस आहे. गुरुपौर्णिमा (29) जुलै रोजी आहे. या यात्रेच्या निमित्ताने थेट गावातून पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून खास रा.प. बसेस जालना विभागाकडून उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचे राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे.
पंढरपूर यात्रेकरिता भाविक प्रवाशांनी जवळच्या आगारप्रमुखांना प्रत्यक्ष भेटून अथवा संपर्क केल्यास भाविकांच्या गावांतून पुरेशी प्रवासी संख्या असल्यास पंढरपूरसाठी जाताना व येताना स्वतंत्रपणे रा.प. बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यात्रेसाठी रा.प. महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, अमृत ७५ वर्ष वयावरील या व इतर सर्व प्रवासी सवलती लागू आहेत. रा.प. महामंडळाच्या या योजनेचा खास यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात यात्रेचा फायदा होईल, खेडे गावांतील भाविकांचा प्रवास अधिक सुखकर व चांगला होण्यास मदत होईल याची योग्य ती दक्षता रा.प. महामंडळाकडून घेण्यात आली आहे.
भाविक प्रवाशांनी कोणत्याह अनधिकृत खाजगी वाहनांतून प्रवास -करता रा.प. महामंडळाने खास आपणसाठी राबविलेल्या या मोहिमेच जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन यांन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. एसटीन पंढरपुरसाठी जादा बसेसचे नियोजन केल्याने भाविकांची सोय होणार आहे-
सुरक्षित व वेळेत प्रवास
जालना एसटी महामंडळाच्या विभागातील जालना, जाफराबाद, अंबड, परतूर या चार आगारांतून पंढरपूर यात्रेसाठी जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व वेळेत करण्याचे नियोजन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.