11.23 percent contaminated water in the Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शहर ग्रामीण भागाला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या खोतांची दर महिन्याला तपासणी करण्यात येते. मे महिन्यात जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ८७३ पाणी नमुन्यांपैकी ९८ पाणी नमुने दुषित आढळले आहेत. ९८ दुषित पाणी नमुने है ८४ गावांतील आहे. म्हणजेच सरासरी ११.२३ टके इतका दूषित पाणीपुरवठा जिल्ह्यात होत आहे.
सध्या जालना जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यावस्त्यांत सुमारे १९० इतक्या टैंकर ने पाणी पुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने टँकरसत मिळेल त्या जलस्रोतावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी नागरिकांना दूषित पाणीही प्यावे लागत आहे.
महत्वांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या जलस्रोतांच्या पाणी नमुन्यांची तपासणी आरोग्य विभागाने जिल्हा प्रयोग शाळेत केली असता, गेल्या मे महिन्यात तब्बल ९८ नमुने दूषित असल्याचे आढळले आहे.
आरोग्य विभागाकडून दरमहा दोन वेळेला बायोमेट्रिक पध्दतीने व एकवेळेला रासायनिक पध्दतीने पाणी नमुने तपासले जातात. नमुने दुषित आढळल्यास संबंधित गट विकास अधिकारी, ग्रामपंचायतीला कळवले जाते. त्यानुसार पाणी प्रक्रियेवर देखरेख ठेवून पुन्हा पाणी नमुने तपासले जातात.
संबंधित ग्रामपंचायतींना पाणी स्वच्छतेबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सूचनाही देण्यात येत आहे.मे महिन्यात जिल्ह्यातील ८७३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. पैकी ८४ गावांतील ९८ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यात सर्वाधिक अंबड तालुक्यातील २७. बदनापूर तालुक्यातील ३५, मंठा तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. त्याशिवाय भोकरदन वगळता इतर तालुक्यांमध्येही अस्वच्छ पाणी नमुने आचळले आहेत.
जल सुरक्षक यांनी दररोज सायंकाळी ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकायचे आहे. ते शुद्ध झाले किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. त्यानंतर ते पिण्यासाठी सोडावे, असे निर्देश दिले आहेत. दर महिन्याला पाण्याची तपासणी होत आहे काय, याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यावे. पिण्याच्या पाण्याच्या खोतामध्ये केरकचरा, घाण टाकू नये, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता ठेवावी, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहे.