Jalna News : महापालिकेच्या शाळेने घेतला मोकळा श्वास file photo
जालना

Jalna News : महापालिकेच्या शाळेने घेतला मोकळा श्वास

नागेवाडी येथील ११ अतिक्रमणे निष्कासित; स्थानिकांतून समाधान

पुढारी वृत्तसेवा

11 encroachments removed in Nagewadi; locals express satisfaction

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील नागेवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या परिसरात करण्यात आलेल्या ११ अतिक्रमणांवर महानगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवार, दि. २६ रोजी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शाळेचा परिसर मोकळा होऊन स्थानिकांतून समाधान व्यक्त केले.

दरम्यान, नागेवाडी येथील शाळेच्या परिसरात अतिक्रमणधारकांनी सिमेंट विटांची पक्की घरे बांधली होती. यापूर्वी त्यांना महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या होत्या. अतिक्रमणधारकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या आदेशाने शाळेच्या परिसरातील ११ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

ही मोहीम सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. या मोहिमेत शोएब खान, तुषार लोखंडे, कादर खान, आमेर खान, हरिश्चंद्र लोखंडे, तसेच महानगरपालिकेचे इतर कर्मचारी आदींना सहभाग घेतला.

या मोहिमेसाठी १ जेसीबी, १ टिप्पर तसेच स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले. अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर संबंधितांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

नाले-रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेची डोकेदुखी

महानगरपालिकेच्यावतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येते. मात्र, पुन्हा काही दिवसांनी तेथे अतिक्रमण होते. याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष होते. परिणामी, वारंवार होत असलेल्या या अतिक्रमणामुळे महानगरपालिका प्रशासनाची डोकेदुखीत वाढ होते. तोच प्रकार नाल्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांचा आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

जालना शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना या कार्यालयामार्फत नोटिसा देण्यात येत असून, रस्त्यांवरील तसेच नाली-नाल्यांवरील अतिक्रमणे स्वखर्चाने काढून प्रशासनास सहकार्य करावे.
विजय फुलंब्रीकर, सहायक आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT